दरोडेखोरांचे चोपड्यात दहशत महिन्यात तिसरा दरोडा, दुकानाचे शटर वाकवून चोरटयांनी 2लाख92 हजार लांबविले



प्रतिनिधी मिलिंद वाणी

चोपडा शहरातील शरदचंद्रीका कॉलनी जवळील घटना तालुक्यातील यावल रोडवर असलेल्या समर्थ ट्रेडर्स या दुकानावर सोमवारी पहाटे अज्ञात ३ चोरटयांनी दुकानात प्रवेश करून सुमारे 2लाख92हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

गोपाळ श्रीराम पाटील (रा. चोपडा शहर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे यावल रस्त्यावर समर्थ ट्रेडर्स नावाचे प्रसिद्ध दुकान आहे. सोमवारी पहाटे तीन अज्ञात ३ अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. दुकानाचे शटर वाकवून चोरटयांनी मध्ये प्रवेश केला. त्यांनी दुकानातील २ लाख ९२ हजार रुपयांची रोकड चोरली. त्यानंतर चोरांनी तेथून पळ काढला. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

घटनेची माहिती मिळताच दुकान मालक गोपाळ पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेत आहे. मागील महिन्याभरात हा तिसरा दरोडा असून याबाबत एक ही दरोडाचा तपास लागला नाही त्यामुळे सामान्य जनमाणसात भीती चे वातावरण दिसून येत आहे. याबाबत तपास एपीआय अजित सबाळे करीत आहेत.