शेतकऱ्याचा नातू व जि. प. प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन जर्मनी येथे एका विषयावर संशोधन करणारे डॉ.योगेश्वर बच्छाव.

 


प्रतिनिधी साक्री: श्री संजय बच्छाव.

दहिवेल येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्री योगेश्वरी बच्छाव हे कै. श्री नामदेव देवबा बच्छाव यांचे नातू व श्री गुलाबराव नामदेवराव बच्छाव यांचे लहान चिरंजीव. शेतकरी कुटुंबातून व प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा घेऊन सुद्धा विदेशात नोकरी करता येते. शिक्षणाची गोडी, शिकण्याची जिद्द, असेल तर कोणतीही शिखर सहज पार करता येतात हे आज डॉ. योगेश्वर बच्छाव यांनी सिद्ध करून दाखवले.आज लंडन येथे पार पडलेल्या ऑक्सफर्ड ग्लोबल काँग्रेस मध्ये एकमेव भारतीय म्हणून “Hurdles to develop a parenteral nanosuspension formulation for clinical trial” या विषयवार संशोंधन प्रबंध सादर के योगेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा पिंपळनेर तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण कर्म आ. मा. पाटील येथे झाले. त्यानंतर त्यांनी औषधनिर्माण शास्त्र या विषयात पदवी घेतली. तसेच M.Pharm आणि PhD इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि या माटुंगा मुंबई येथील नामांकित संस्थेत पूर्ण केली.  गेट २००१ आय. आय .टी . कानपुर संस्थेने घेतलेल्या परिसंख्येत त्यांनी भारतातून ११ व महाराष्टरातून पहिला येण्याचा मान मिळवला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव)  येते बी. फार्मसाठी तसेच मुंबई विद्यापीठ येथे घेतलेल्या एम .फार्म. साठी घेतलेल्या परीक्षेत त्यांनी विद्यापीठात गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम केला.

वयाच्या २६ व्या वर्षी PhD पूर्ण करून त्यांनी स्वित्झर्लंड येथे प्रयाण केले. तेथे सलग ८ वर्ष ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी आणि इंजेक्टबल ऑनकॉलॉजि या विषयावर संशोधन केले. त्यानंतर गेली १० वर्ष ते जर्मनी येथे अँटी-इंफेक्टिव्हस या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्या नावावर २ भारतीय तसेच ६ आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. तसेच आतापर्यंत त्यांनी जगातील नामांकित जर्नल्स मध्ये १७ शोध निबंध प्रकाशित केली आहेत. तसेच त्यांनी विले जर्मनी या नामांकित प्रकाशांकरिता २ पुस्तके हि लिहिले आहेत. तसेच सुमार ५० च्या वर अनंतरष्ट्रीय स्तरावर नामांकित चचासत्रत त्यांचे ओरल प्रेसेंटेशन्स झाले आहेत. दहिवेल येथील साधारण शेतकरी कुटुंबात योगेश्वर यांचा जन्म झाला आणि त्यांच्या ग्रामीण बॅकग्राऊंड चा त्यांना खूप अभिमान आहे, बाहेर अहिराणी भाषेचं कसा प्रसार होईल त्याचा हि ते प्रयत्न करतात. विदेशात राहून सुद्धा आपल्या ग्रामीण भागातील, खानदेशातील अहिराणी भाषेची त्यांना आवड आहे गोडी आहे म्हणून ते त्यांच्या मित्रांना आपली खानदेशी भाषा "अहिराणी "शिकवत आहेत. तसेच प्रचार व प्रसार सुद्धा डॉक्टर योगेश्वर बच्छाव हे जर्मनी इंग्लंड येथे करत आहेत.