मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 


किरण माने इंदापूर प्रतिनिधी

    शेळगाव १ मे रोजी शेळगाव येथील मॉर्डन इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कॉलेजचे प्राचार्य संदीप जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

       याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य संदीप जाधव, मुख्याध्यापिका सौ शितल वाघ, संतोष जाधव, पूजा कोतमिरे,शरद बोराटे,प्रतिभा मोहिते आणि कॉलेजचे,कर्मचारी,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.