सतीश कोळी,खुलताबाद प्रतिनिधी
दि.६ मे २०२३
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे पार पडले. या अधिवेशनात राज्याध्यक्षपदी विजय कोंबे; तर राज्य सरचिटणीसपदी राजन कोरेगावकर यांची निवड करण्यात आली होती.
त्यानंतर दोन महिन्यांनी पुणे येथे राज्य कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत राज्य शाखेचा विस्तार करण्यात आला. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून राज्य प्रवक्तेपदी नितीन नवले, मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी श्याम राजपूत व विभागीय प्रसिद्धी प्रमुखपदी सतीश कोळी यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रणजीत राठोड, विष्णू भंडारी, किसन जंगले, दिलीप रासने, पंडित भोसले, राऊफ पठाण, कडूबा साळवे,अशोक डोळस, के. डी. मगर, निंबा साळुंखे,कैलास ढेपले, दत्ताभाऊ खाडे यांनी अभिनंदन केले.