मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, चंदननगर भागात गुन्हे शाखेची कारवाई

   


पुणे: चंदननगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून मसाज सेंटरचा मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर भागातील डेला थाई नावाच्या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन एका महिलेला ताब्यात घेतले. मसाज सेंटरच्या मालकासह व्यवस्थापकाच्या विरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनिमयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अजय राणे, इरफान पठाण, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक, ओंकार कुंभार आदींनी ही कारवाई केली.