सटाणा दि.10 :- तालुक्यातील देवळाने येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य भावसींग पवार यांचे सामाजिक कार्य मोलाचे असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील असतात तसेच भाजपा संघटन देखील चांगले आहे त्यामुळे त्यांच्यावर आता भाजपा ब्राम्हणगाव गट प्रमुख पदी सार्थ निवड करण्यात आली
नियुक्ती पत्र देताना भाजपा तालुका अध्यक्ष संजय देवरे जिल्हा सरचिटणीस सुरेश सोनवणे,तालुका सरचिटणीस दिलीप बाबा खैरनार, शहर अध्यक्ष राहुल सोनवणे,मंगेश खैरनार,राकेश घोडे, देवेंद्र पवार ई. उपस्थित होते त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या