बेलगाव मध्ये तथागत गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.



            महिला मंडळी आणि नागरिक यांनी हातात मेणबत्त्या घेऊन गावात फिरुन शांतीचे प्रतिक हा संदेश दिला

दिपक देशमुख मेहकर प्रतिनिधी. 

महात्मा गौतम यांचे पुर्ण नाव सिद्धार्थ गौतम होते त्याचा जन्म 483 ते 563 इ. स. पुर्व मध्ये कपिल वस्ती जवळील नेपाळ मधील लुबिनी येथे झाला कपिलवस्तुची राणी महामाया देवी यांच्या पोटी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्याच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते जो शाक्यांचा राजा होता पारंपारिक कथानुसार त्याची आई मायादेवी होती जी कोळी कुळातील सिद्धांर्थच्या जन्मानंतर 7 दिवसांनी तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्याची मावशी आणि शुद्धोधनाची दुसरी राणी महाप्रजावती गौतम यांनी त्यांचे संगोपन केले त्यानंतर त्यांचे नाव सिद्धांर्थ ठेवण्यात आले 

सिद्धार्थ नावाचा अर्थ आहे जो सिद्धी प्राप्त करण्यासाठी जन्माला आला आहे म्हणजेच सिद्धार्थाने आपल्या कृतीतून सिद्ध केलेला परिपूर्ण आत्मा गौतम बुद्ध बनुन त्याच्या जन्माच्या वेळी एका भिक्षुने भाकीत केले होते की मुल एक महान राजा किंवा महान धर्माचा प्रचारक असेल नंतर गौतम बुद्धांनी साधु महाराजांची हि भविष्यवाणी खरी ठरविली आणि ते पवित्र बौद्ध धर्माचे आणि समाजाचे प्रवर्तक बनले तसेच तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीला गावातील महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.