इगतपुरी*प्रतिनिधी - सुनिल नाठे
इगतपुरी तालुक्यामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना इगतपुरी मधील बेलगाव त-हाळे गांगडवाडी व घोटी सिन्नर हवेला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर समृद्धी महामार्गावर फुलाचे काम चालू असताना फुल कोसळला सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतु स्थानिकांनी सदर काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे व्यक्त केले व सदर कामाची प्रशासनाकडून चौकशी व्हावी अशी मागणी पंचायत समिती इगतपुरी मा. उपसभापती श्री पांडुरंग वारूंगसे यांनी केली आहे.