वेरुळ येथे जबरी चोरीचे सत्र सुरूच आणखी दोन घरफोडी, परिसरात भीतीचे वातावरण लाखो रुपयाचा ऐवज लंपास.


प्रतिनिधी हरिदास सराटे

 वेरूळ परिसरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून कुठे ना कुठे चोरीचे सत्र सुरूच असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये अनेक दिवसापासून भीतीचे वातावरण पसरले आहेत. सहा महिन्यात अनेक ठिकाणी घरफोड्या गाड्या चोरी होणे दागिने चोरणे, मोबाईल चोरणे, याचप्रमाणे श्री घृष्णेश्वर मंदिर येथेही पाकीट मारणे दागिने चोरणे अशा अनेक घटना सतत घडत आहेत. रविवारी रात्री विश्वकर्मा कॉलनीत दोन ठिकाणी चोरी झाली असून , घरफोडी झाली असून चोरट्यांनी समोरच्या बाजूने दरवाजे तोडून घरात प्रवेश करीत रोख रक्कम आणि दागिने व काही वस्तू लंपास केल्या. सुदाम रेवाजी थोरात चा मुलगा अभिजीत थोरात यांची बजाज पल्सर मोटरसायकल ही घरासमोर लॉक अवस्थेत असताना सुद्धा चोरी झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरासमोरील कल्याण रावजी भादगले हे काही कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे चोरट्यांना समजतात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारत  यांच्या घरातील जवळपास वीस तोळे सोने अर्थात लाखो रुपयांची दागिने वस्तू सह, पूजेचे साहित्य पूजेचे चांदीचे ताट वगैरे अंदाजे अर्धा किलो चांदी आणि पाच लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे.
 
            सदरील चोरीचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्यामुळे वेरूळ येथील  लोकांनी यांनी तात्काळ पोलीस स्टेशनची संपर्क करून सदरील चोरीचा पंचनामा करून प्रवास पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. यावेळी वेरूळ येथे तपासासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी मुकुंद आगाव , खुलताबादचे पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन मुरमे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ ,पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे सह स्थानिक गुन्हे शाखेचे नागझरे,पात्रीकर, गांगवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बिघोत , रमेश वराडे, सुदाम साबळे, जगन्नाथ बळी तसेच  औरंगाबादहून श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखा, फिंगरप्रिंट तपासणी.... यांनी पाहणी करून त्वरित पुढील कारवाई तपास सुरू केला आहे.

मागील आठवड्यातही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.घरमालक कुठे गावाला गेले का त्यांचे घर फोडले जाते अशा घटना येथील परिसरात चालू आहे.वेरूळ परिसरात गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेले चोरीचे सत्र थांबत नाही त्यामुळे पोलिसांना चोर पकडण्यासाठी मोठे आव्हान झाले आहे.