*श्रीरामपूर(प्रतिनिधी/राजेंद्र सूर्यवंशी):-
शहर आणि तालुक्यातील अवैध धंदे उगडपणे चालू आहे ते त्वरित बंद करण्याकरिता आज छावा स्वराज्यरक्षक सेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर),भीम गर्जना सामाजिक संघटना यांच्या वतीने सामूहिक निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक भोर मॅडम यांना देण्यात आले आणि ८ दिवसात कारवाई करून सर्व अवैध धंदे बंद नाही झाले तर स सर्व संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा ही देण्यात आला आहे पुढे त्या निवेदनात म्हटले आहे की,श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात गुटखा,मटका(अकडे),जुगार अड्डे,बिंगो,लाल काळा,मन्ना पत्ता अशा अनेक प्रकारचे अवैध धंदे उगडपने चालू आहे शहरात तर किराणा दुकाना पेक्षा चौका चौकात गुटखा,मटका(आकडे), बींगो चे दुकाने आहे त्याच बरोबर ग्रामीण भागा सुद्धा मागे नाही;
बेलापूर बुद्रुक, टाकळीभान,हरेगाव हे तर मटका(आकडे),मन्ना पत्ता,जुगार,गुटख्याचे माहेर घर झाले आहे याच्यावर कोणतेही पोलिस प्रशासनाचे वचक राहिले नाही आणि काही पोलिस प्रशासनाचे अधिकारी यांना मदत करतात तरी हे अवैध धंदे बंद झाले पाहिजेत अगर ८दिवसात हे बंद झाले नाही तर श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्या समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ही छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आंबेडकर) युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे यांनी सामूहिक दिला आहे
निवेदन देतानी छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गायकवाड,छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश भोसले,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फिरोजभाई पठाण,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष रफिक शाह,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सोनू शेख,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे तालुका संघटक मुनाफ पिंजारी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आंबेडकर) युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आंबेडकर)तालुकाध्यक्ष श्रीकांत महांकाळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आंबेडकर) युवा तालुकाध्यक्ष विकास जगधने हे उपस्थित होते.