ता.प्र. | आकाश साळुंके
सटाणा दि.17 :- छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात पुरंदरावरील जन्मोत्सवाचा आनंद सुटला तर आयुष्यभर दुःख पदरी आले परंतु ते खचले नाहीत आणि आपण त्यांचेच मावळे आहोत म्हणून आजच्या तरुणांनी न खचता जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा संभाजी महाराजांचा इतिहास आठवा दुःख आपोआप नाहीस होईल तेवढी ताकद छ.संभाजी या नावात आहे असे ऊर्जादायी विचार प्रसिध्दी युवा लेखक व शंभू व्याख्याते राकेश पिंजन सरकार यांनी मांडले
बागलाण तालुक्यातील द्याणे गावात प्रथमच च महाराजांची 366 वी जयंती हि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त ग्रामस्थानी व्याख्यानाचे आयोजन केलेले होते सकाळी गावात भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच रांगोळी फुलांचा प्रत्येक मार्गावर स्वागत झाले नंतर दुपारी ग्रामस्थांच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले व सायंकाळी व्याख्यान झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ ,उपसरपंच के.पी कापडणीस , मोठाभाऊ कापडणीस,प्रमोद कापडणीस,हितेंद्र कापडणीस , भूषण कापडणीस तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.