प्रतिनिधी,नांदुरा
नुकत्याच नांदुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडून सभापती,उपसभापती यांची निवड झाली असून त्याअनुषंगाने मराठा सेवा संघाच्या वतीने २७ मे रोजी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रात्री ८ वाजता नवनिर्वाचित सभापती,उपसभापती व संचालक मंडळ यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी सभापती भगवान धांडे,उपसभापती प्रदीप हेलगे,संचालक मोहन गावंडे,गौरव पाटील,पुरुषोत्तम झाल्टे यांना छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा,पुस्तकं भेट देत पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री सचिन तायडे साहेब यांच्या सह योगेश पाटील,एस.पी.संबारे, विष्णु म्हैसागर,दिलीप अढाव,पुरुषोत्तम वनारे,राहुल वनारे,गजानन काकर,सचिन देशमुख,विवेक तायडे,रवींद्र लांडे,अण्णा गायकवाड,रवी खाराटे,शुभम लाहुडकार,उल्हास संबारे,देविदास पिसे,मंगेश सोळंके,अमर रमेश पाटील,दिलीप कोल्हे,एकनाथराव कोल्हे,विनोद वनारे,सचिन बाठे,संतोष सोळंके,हिमांशू अवचार व इतर उपस्थित होते