दिपक देशमुख मेहकर.
नागरिक याच्या गाडीला अपघात होतात आणि अनेक नागरिकांनी आपला जीव गमवाला याला जबाबदार कोण.
डोणगांव. डोणगांव येथून सम्रृध्दी महामार्ग गेलेला असून सम्रृध्दी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी डोणगांव येथे पेट्रोल पंप आहे व याच पेट्रोल पंपाच्या परीसरात सम्रृध्दी महामार्गावर वाहनांच्या रांगा उभ्या असलेल्या दिसून येत असून हे ठिकाण एक प्रकारे अवैध वाहनाचा थांबा झाला आहे याकडे सम्रृध्दी महामार्ग प्राधिकरणाचे व वाहतूक पोलीस यांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोणगांव येथे समृद्धी महामार्ग लगत सध्या वाहनाच्या रांगा थांबलेल्या अवस्थेत दिसून येतात कारण पेट्रोल पंप परीसरात व खाजगी शेतकरी यांच्या शेतात खाद्य पदार्थ व फळ विक्री होत आहे
त्यामुळे वाहने तासनतास या ठिकाणी थांबतात वास्तविक सम्रृध्दी महामार्गावर वाहनाना उभे करण्यास मनाई असताना डोणगांव येथे माञ सर्रास वाहने उभी आढळून येतात. अशातच सम्रृध्दी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर सदर पेट्रोल पंप परीसरात ट्रक का थांबतात यांची चौकशी होणे गरजेचे आहे व स्थानिक पोलीस प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासन व सम्रृध्दी महामार्ग प्राधिकरण यांनी याकडे लक्ष वेधले तर येथील वाहने थांबणे व या ठिकाणी मिळत असणार्या अवैध सुविधाना लगाम लागू शकतो.