शेळगाव : दिनांक २५-५-२०२३ उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळगाव या कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळगाव (घुमटमळा) या विद्यालयाचा कला,विज्ञान व वाणिज्य या तीनही विद्याशाखांचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. काॅलेज मधील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री. संदीप जाधव, स्वप्नाली कुंभार, संतोष जाधव परिवेक्षक , मंगेश वाघ , अमृता बोराटे ,योगिता गाढवे, स्नेहा बोराटे या सर्व शिक्षक वृद्धांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे व्यवस्थापन मंडळाच्या वतीने अभिनंदन केले.
विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी पुढील पणे :
Arts(कला)
1. गावडे प्रीती सदाशिव - 78.17 % 2. चव्हाण अक्षय बाळू- 65.66 % 3. जाधव काजल विजय - 58.00 %
Com( वाणिज्य)
1. आटोळे निशांत अशोक - 89.83% 2 . वाघमोडे दिक्षा आण्णा - 80.83% 3. शिंदे हर्षदा नामदेव - 76.17%
Science ( विज्ञान )
1. गंधारे आदित्य तानाजी - 87.50% 2.शिंगाडे स्नेहा दासा- 87.00% 3. कोथमीरे श्रुती प्रदिप - 83.00%