महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त ग्रामपंचायत गोंदे दुमाला येथे ध्वजारोहण



   प्रतिनिधी सुनील नाठे  गोंदे

    सोमवार दि.१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत गोंदे दुमाला ध्वजारोहण सरपंच श्री दादू (शरद) सोनवणे यांचे प्रास्तावितेनुसार आज कामगार दिन असल्यामुळे ध्वजारोहण ग्रामपंचायत कर्मचारी यांचे हस्ते करण्यात यावे असे प्रस्तावित केल्याने ग्रामपंचायत कर्मचारी श्री. सुनील नाठे व इतर कर्मचारी यांचे शुभ हस्ते संपन्न झाले 

    यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच दादू (शरद) सोनवणे, उपसरपंच सौ. शोभा नाठे, ग्रा. वि.अधिकारी  श्री. विजयराज जाधव ग्रा. पं. सन्मा. सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळ गावातील ज्येष्ठ नागरिक जी.प. शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेवक तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते व यावेळी शालेय शिक्षण समितीच्या वतीने नवनिर्वाचित मार्केट कमिटी संचालक श्री रमेश सदाशिव जाधव यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचे सांगता केली.