सांवंगीच्या भैरवनाथ बाबांच्या मंदिराचें अडीच कोटी रुपये खर्चून होणार मंदिराचे भूमिपूजन......


27 मेला सायंकाळी पाच वाजता देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार भूमिपूजन, आ. प्रशांत बंब, आ. आंबादास दानवे यांची राहणार प्रमुख उपस्थिती......

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांच्या मंदिराच्या नवीन मंदिराच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन 27 मेला सायंकाळी पाच वाजता देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून आ. प्रशांत बंब, आ. आंबादास दानवे यांची  प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार असल्याची माहिती समितीचे अद्यक्ष अशोक म्हसू पवार, उपाद्यक्ष संजय पांडव,सचिव दादा तुळशीराम पवार यांनी संयुनक्तपणे दिली आहे.

               दरम्यान गंगापूर तालुक्यात भैरवनाथ बाबा नवसाला पावणारा देवा अशी ख्याती आहे त्यामुळे जिल्हाभरातून अनेक भाविक भक्त भैरवनाथ बाबाला नवस बोलतात नवस व मनोकामना पूर्ण झाल्यावर रोडगे व वरण यांच्या महाप्रसाद करून नवस फेडण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून अविरतपणे चालत आहे मात्र नवसाला पावणाऱ्या  भैरवनाथ बाबांचे मंदिर हे फार प्राचीन होते मात्र छोटे होते सावंगीचे गावकरी यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक,नागरिक यांची खूप वर्षांपासून इच्छा होती कीं याठिकाणी भव्य दिव्य असे भैरवनाथ बाबां मंदीर उभे राहावे भाविकांची ती इच्छा आत्ता पूर्ण होणार असून तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून हे  मंदिर उभे राहणार असल्याने भाविकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

         मीनाताई संजय पांडव (सरपंच, लासूर स्टेशन) सावंगीचे भैरवनाथ बाबांचे देवस्थान नवसाला पावणारे असल्याने जिल्हाभरातून अनेक भाविक भक्त आपल्या मनातील इच्छा याठिकाणी येऊन नवस बोलतात व नवस पूर्ण झाल्यावर दरवर्षी भैरवनाथ बाबांच्या यात्रेला नवस फेडण्यास भविक सहकुटुंबं सहपरिवार येत असतात मात्र पूर्वीच्या लोकसंख्येनुसार जुन्या मंदिराची रचना आहे मात्र आता भाविकांचा घ वाढल्याने मंदिर नवे व्हावे असे सार्व भाविक व गावकरी यांची इच्छा होती त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवल्याने भव दिव्य मंदिर सर्वांच्या सहकार्याने लवकरच उभारले जाईल.

        अशोक म्हसू पवार (अद्यक्ष, भैरवनाथ देवस्थान समिती)  गाव करील तें राव काय करील या उकतीप्रमाणे सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांचे भव्य दिव्य मंदिर सावंगी, लासूर स्टेशन,दायगाव,भानवाडी गावाकऱ्यांच्या सह पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सहकार्याने उभारले जाईल नवसाला पावणारा देवा असल्याने भाविकांचा ओघ सध्या वाढत चालला आहे त्यामुळे नवीन मंदिराची उभारणी होणे गरचेचे होते भाविकांची ही स्वप्नपूर्ती लवकरच पूर्णतःवला जाणार असून भाविक भक्तांनी मंदिराच्या बांधकामाला देणगी देऊन सढळ हाताने मदत करावी त्यासाठी 9822480980,8275527777,9890469712 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भाविकांना समितीचे अद्यक्ष अशोक पवार यांनी केले आहे.