वार्ताहर पंकज गायकवाड
यश मिळवण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती आणि खडतर परिश्रम जर तुमच्या अंगी असतील तर ते यश तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही; याची प्रचिती आज लागलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालावरून दिसून आली. जिल्हा परिषद शाळा न्याहारखेडे ता. येवला जि. नाशिक या शाळेतील विद्यार्थिनी कावेरी साईनाथ दाणे हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या तसेच सायगाव केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सामान्य परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबातील कावेरी हिने आपल्या सातत्यपूर्ण व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले.तिला वर्गशिक्षिका वाघ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्रनाथ शेळके, मुख्याध्यापक शरद संसारे, पदवीधर शिक्षक वाल्मीक नवले, शिक्षिका श्रीमती कुमावत मॅडम, श्रीमती जोशी मॅडम, श्रीमती वडनेरे मॅडम ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू देवरे उपाध्यक्ष आप्पासाहेब डुबे आदींनी तिचे अभिनंदन केले.