कुपोषण मुक्त अभियानाचे आयोजक संजय शहापूर यांच्या उपक्रम.
सोयगाव तालुका प्रतिनिधी रईस शेख
सिल्लोड:- सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील आरोग्य वर्धीनी केंद्रात झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ६५ बालके व माता यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.कुपोषण कमी करण्यासाठी लोक सहभागातून सुरू असलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रियदर्शिनी पवार यांनी केले.
आयोजक संजय शहापूरकर यांनी सांगितले की कुपोषण मुक्त अभियान काळाची गरज आहे. यासाठी आता तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची सुरवात आज होत आहे.या नंतर लॅब टेक्निशियन सागर धनवट यांनी सर्व लॅब टेस्ट केल्या आरोग्य डॉ.प्रियदर्शिनी पवार यांनी बालक व माता यांची आरोग्य तपासणी केली. त्या नंतर संजय शहापूरकर यांच्या हस्ते मोफत औषधी वाटप करण्यात आली.या प्रसंगी आरोग्य सेवक धमने, आशा सेविका मदतनीस अंगणवाडी सेविका सागर धनवट उपस्थित होते.