तालुका प्रतिनिधी - सुरज पुरारकर
तळा तालुक्यातील मोहल्याच्या खालच्या बाजूस इंदापूर - मुरुड या रस्त्या लगत आसणारे दुकान फोडून काही सामान व रोख रकमेसह चोर फरार. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 3मे रात्री 2च्या नंतर अज्ञात चोरांनी खालच्या चिंचेच्या येथील असिफ जलील फटाकरे यांचे मालकीचे अफताफ जनरल स्टोअर्स दुकान फोडून दुकानातील रोख रक्कम 52हजार किमतीचे साहित्य व काही रक्कम चोरल्याची घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनस्थळाला भेट दिली .श्वान पथक तसेच फिंगरप्रिंटद्वारे तपास केला असता हाती काहीच लागले नाही असे निष्पन्न झाले.
दरम्यान दुसऱ्या दिवशी तळा तालुक्यातील बाजारपेठ मध्ये फिर्यादी वैशाली वाघमारे रहाणार हनुमान नगर ही व्यक्ती दी.4 मे रोजी बाजार पेठ, आंबेडकर चौक या ठिकाणी खरेदी करत असता अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल वरून गळ्यात असलेली 3 तोल्याची गंठण हिसकावून इंदापूर कडे धाव घेतल्याचे प्रकरण समोर आले. अशी माहिती सूत्राकडून मिळाली .सदर 2दिवसात 2 चोऱ्या झाल्याचे प्रकरण तळा तालुक्यात घडले असून अज्ञात चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर "आ "वासून उभे आहे.तालुक्यातील व्यापारी वर्ग तसेच महिला वर्गात मोठे भीतीचे सावट पसरले असल्याचे दिसून येते.