प्रतिनिधी-हर्षदा काणेकर.
दिनांक २मे २०२३रोजी कल्याण पूर्व ,महाराष्ट्र नवनिर्मांंण सेना विभागीय जनसंपर्ककार्यालयाचे उदघाटन मा. प्रमोद (राजूदादा)पाटील (आमदार)म.न.से नेते यांच्याहस्ते पारपडला. श्री स्वप्निल शिवराम पंडित केंद्रीय सचीव म न रे का सेना यांनी या उदघाटनाचे आयोजन केले होते. संजय बिरंजे (विभागअध्यक्ष) अभिषेक डे(विभाग संघटक), कल्पना कालेकर (शहर उपाध्यक्ष विधी जनहित) ,जितेद्र पाटील मनरेका सेना अध्यक्ष ,राजसाहेबांचे कट्टर समर्थक ऊमेश पावशे ,ऊर्मीला तांबे ,दिपीका पेडणेकर ,उल्हास दादा भोईर (जिल्हा अध्यक्ष),कौस्तुभ देसाई (शहर अध्यक्ष ,संदीप नावगे (जिल्हा सचीव ) स्वाती कदम,शितल विखणकर ,इतर उपस्थित मान्यवरांनी मा. प्रमोद (राजूदादा)पाटील यांचे स्वागत केले . यावेळी कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे देशमुख सर उपस्थितहोते. श्री प्रमोद पाटील यांनी उदघाटनाचे कौतुक व सर्वांचे आभार मानून राजगड कार्यालयात नाविन्य पूर्ण कार्यक्रमाचे सतत आयोजन करावे असे आवाहन केले चाहत्यांना फोटोचा आस्वाद देत श्री प्रमोद पाटील यांनी निरोप घेतला.