निसर्ग मित्र समितीच्या पदाधिकारी यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

 


प्रतिनिधी साक्री:  संजय बच्छाव.

आज दि.16.5.2023. रोजी माननीय तहसीलदार साक्री यांना निसर्ग मित्र समिती साक्री तालुका यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन असे की काल परवा विटाई ,बेहेड,निळगव्हाण काटवान भागातील डेरमाळ येथील डोंगरावर जो वनवा पेटला,डोंगर जळाले हे एक काल आमच्या निसर्ग मित्र समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेच फोटो काढून ग्रुप वर टाकले लागलीस ते फोटो सगळ्या ग्रुप वर व्हायरल झाले. ही आग कोणी लावली का लावली याविषयी चर्चा झाली. त्या आग मध्ये हजारो वृक्ष जळून खाक झाले. 

कित्येक जीव जंतू या आगीत होरपळून मरण पावले अशीच जर जंगल पेटत राहिली तर भविष्यात फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वेळीच पावले उचललेली बरी. त्यासाठी आम्ही साक्री तालुका निसर्ग मित्र समितीचे पदाधिकारी साक्री तालुका कार्याध्यक्ष श्री बी एम भामरे सर, साक्री तालुका अध्यक्ष श्री अनिल अहिरे सर,व उपाध्यक्ष श्री संजय कालेश्वर बच्छाव यांनी मा.तहसीलदार आशा गांगुर्डे मॅडम यांना व पिंपळनेर वनपरिक्षेत्राधिकारी(आर. एफ. ओ. )अधिकारी यांना निवेदन दिले व जे कोणी असे वाईट कृत्य करत असेल त्यांना कठोरात कठोर कारवाई व्हावी असे साक्री तालुका निसर्ग मित्र समितीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.