प्रतिनिधी साक्री संजय बच्छाव
राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी जि प शाळा पवार पाडा येथे साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच मा.युवराज हाडाळ साहेब यांनी प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले.
त्यावेळी उपस्थितांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिता ताई पवार, तसेच केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक श्री मा. वासुदेव पाटील सर, यांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले श्री दत्ता लव्हाळे सर, ललित मोरे सर, श्रीमती सुषमा वाघमोडे मॅडम. मदतनीस कमलताई पवार या सर्व शिक्षक वृंद यांनी श्री शाहू महाराज यांचे प्रतिमेचे पूजन केले तसेच सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाहू महाराज पुण्यतिथी साजरी केली.