उद्योजक श्री बबन हैबतपुरे यांचा लग्न वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा


उदगीर/तोंडार 

उदगीर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. बबन हैबतपुरे यांच्या लग्नाचा 27 वा वाढदिवस मौजे तोंडार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उद्योजक श्री शिवाजीआण्णा हुडे व पंचायत समितीचे माजी सदस्य श्री राजेंद्र पाटील यांच्या हस्ते  27 वृक्षांचे रोपण करून साजरा करण्यात आला. श्रीयुक्त बबन हैबतपुरे यांनी अलीकडेच आपला 48वा वाढदिवस 48 वृक्षारोपण करून साजरा केला होता. बबन हैबतपुरे हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व असून पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावा झाडे जगवा मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. डिसेंबर महिन्यात 31 युवकांना घेऊन त्यांनी उदगीर ते  जगन्नाथपुरी सायकल यात्रा मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील गोरगरीब व गरजू लोकांना सढळ हाताने ते मदत करत असतात. 

    श्री बबन हैबतपुरे यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आपले उद्योग साम्राज्य उभे केले आहे. उदगीर परिसरात उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी मारून सुद्धा जमिनीवर पाय असलेला व सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेला एक तरुण उद्योजक म्हणून बबनभाऊ परिचित आहेत. उदगीर ही नगरी सांस्कृतिक व धार्मिक घटकांना महत्त्व देणारी आहे हे ओळखून बबनभाऊ यांनी सन 2013मध्ये परमपूज्य राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा श्रावण मास अनुष्ठानचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या घेऊन अत्यंत कमी वयात आपले नेतृत्व सिद्ध केले होते. सामान्य कुटुंबातून आल्यामुळे सहाजिकच गोरगरिबाप्रति कमालीची असता त्यांच्या वागण्यात दिसून येते नव्हेच तर उदगीर परिसरात त्यांना गोरगरिबांचा मसीहा म्हणूनही ओळखले जाते. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी अग्रेसर असलेली नाव म्हणजे आदरणीय बबनभाऊ होत. याचे उदाहरण म्हणजे या वर्षभरात त्यांनी आपल्या मित्र परिवारांचा व आप्तेष्टांचा जन्मदिवस व लग्न वाढदिवस वृक्ष भेट देऊन साजरा केला आहे. येत्या जुलै 2023 पर्यंत 1001 वृक्ष लागवडीचा संकल्प त्यानी केला आहे.

    याप्रसंगी प्रा .कुमार बिरादार, प्रा माधव भंडारे, प्रा मनोहर भालके, श्री बी एम बिरादार, प्राचार्य नळगीरकर, श्री नारायण पोपलाई ,उद्योजक बालाजी हैबतपुरे, राजकुमार हैबतपुरे, गंगाधर काचाबावर, किशन खत्री, शिवलिंग हैबतपुरे, बालाजी बोतिकर, कांत चीद्रेवर व तोंडार नगरीतील प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.