सुदिपकुमार देवकर कळंब शहर प्रतिनिधी :
कळंब शहरातील नगर परिषद शाळेच्या आवारात आक्षशाह भरविला जातोय शेळ्यांचा बाजरी याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब ता. कळंब येथील नगर परिषद शाळेच्या प्रांगणात शाळकरी मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे.
परंतू नगरपालिका प्रशासनाने येथे शेळ्यांचा बाजार भरविण्याची परवानगी दिली आहे. यामुळे शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कळंब नगर पालिका प्रशासनाने तेथील शेळ्यांचा बाजार तात्काळ हटविण्यात यावा अश्या स्वरुपाची मागणी कळंब शहरवासीय पालक यांच्याकडून होत आहे.