रानमाती वांझ झाली, जगण झालयं गुडुप
हिरव्यागार संसाराच जळुन गेलय झुडूप
कुरुप झालयं काळजाला, हातावर घट्टा आहे
पावसाच येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे
सातबारा रडतोय आता, वहीरी सुध्दा आटल्यात
बाटुक झालयं लेकराच, वाढी त्यांच्या खुंटल्यात
गोठुन गेल्यात रक्तासवे ठिसूळ झाली हाड
नवा पेच असतो तरी आमच्या पुढे रोज
फाटके कापडं पोराला अन् जुनचं पुस्तक पोरीला
राबराब राबुन सुध्दा आमचा घाम जातोय चोरीला
आमचा घाम जातोय चोरीला..!!
कवयित्री-पुजा प्रमोद चव्हाण,
बनशेंद्रा ता. कन्नड जिल्हा. छत्रपती संभाजीनगर