येवल्यात पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व कार्यक्रम अधिकारी यांच्यावर लाच प्रकरणी कारवाई

 


पंकज गायकवाड येवला प्रतिनिधी:-

गाय गोठ्याच्या फायलीवर सही करण्यासाठी येथील पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी कार्यक्रम अधिकाऱ्याला लाच घेण्याचे मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांचे गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याचे मोबदल्यात कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी लहू सपकाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन फाईलचे प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे 1500 रुपये व विस्तार अधिकारी आनंदा रामदास यादव यांनी तीन फाईलचे प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 1500 रुपये लाचेची मागणी केली व तडजोड अंती एक हजार रुपये लाचेची रक्कम ठरली. 

ही रक्कम मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून नाशिक येथील पथकाने सापळा पूर्व पडताळणी केली असता ;पडताळणी कारवाईदरम्यान लहू सपकाळे यांनी 1500 रुपये व यादव यांनी तीन फाईल ची 1500 रुपये लाचेची मागणी केली व तडजोड अंती 1000 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची मान्य केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1998 चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...