प्रतिनिधी -शेख अल्ताफ
आज 1मे म्हणजे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस लव्हाळा येथील ग्रामपंचायत मध्ये साजरा करण्यात आला, प्रथम सरपंच सौ.मिनाताई गणेश लहाने यांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन केले, नंतर सरपंच सौ.मिना ताई लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सचिव, सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
जि.प.मराठी शाळा लव्हाळा येथे शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री संजय प्रल्हाद लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, व पालक उपस्थित होते.लोणी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिवस साजरा करण्यात आला, यावेळी कामगारांना पुष्प गुच्छ देउन त्यांचं स्वागत करण्यात आले, सरपंच सौ.उज्वलाताई महेंद्र जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी ग्रामपंचायत सचिव, सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते