प्रतिनिधी साक्री संजय बच्छाव..
आमचे मार्गदर्शक नेता माननीय श्री बिंदू शेठ शर्मा हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत असतात बिंदू शेठ शर्मा यांनी साक्री तालुका ,सटाणा तालुका व पूर्ण धुळे व नाशिक जिल्हा शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाविषयी किंवा बँकेतील थकबाकीदार शेतकरी याविषयी वेळोवेळी आवाज उठवून शेतकऱ्यांची मदत केली आहे त्याचीच एक पावती म्हणून त्यांना आज भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली .
त्याबद्दल साक्री तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपा साक्री तालुका अध्यक्ष श्री वेडू अण्णा सोनवणे, सरचिटणीस श्री शैलेंद्र भाऊ अजगे, तसेच भाजपा किसान मोर्चा साक्री तालुका अध्यक्ष श्री संजय कालेश्वर बच्छाव यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. व शर्मा साहेबांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या