आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोयीच्या शाळा देण्यात याव्यात. -जिल्हा शिक्षक समितीची मागणी



सतीश कोळी,खुलताबाद प्रतिनिधी

    सातारा जिल्हा परिषद सातारा येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून  120 प्राथमिक शिक्षक सध्या हजर झालेले आहेत. आंतरजिल्हा बदली च्या प्रक्रियेनुसार त्यांना लवकर पदस्थापना देण्यात येणार आहेत.

करिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून रिक्त जागा पाहून त्यांना सोयीच्या शाळा देण्यात याव्यात. अशी मागणी सातारा जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे व जिल्हा सरचिटणीस श्री किरण यादव यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी साहेब  व शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर यांना निवेदनाद्वारे केली आहे.120 प्राथमिक शिक्षकांमध्ये अनेक महिला भगिनी हजर झालेल्या असून अनेकांनी कुटुंबापासून बरीच वर्षे  खूप दूरवर नोकरी केलेली आहे. खूप प्रयत्न करून त्यांची बदली  स्वजिल्ह्यात झालेली आहे.

 त्यामूळे स्व जिल्ह्यात आलेल्या सर्व  शिक्षक बंधू भगिनी यांना सोयीची शाळा देण्यात यावी अशी मागणी सातारा जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री विश्वंभर रणनवरे,जिल्हा सरचिटणीस श्री किरण यादव,बँकेचे चेअरमन श्री नवनाथ जाधव,माजी जिल्हाध्यक्ष श्री शंकरराव देवरे,बँकेचे संचालक श्री तानाजी कुंभार,जावळीचे अध्यक्ष श्री सुरेश पार्टे,माजी उपाध्यक्ष श्री संजय नांगरे,बांदेकर सर,संपतराव साकुर्डे यासह शिक्षक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सर्व हजर झालेल्या शिक्षक बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली. ज्यांना राहण्याची सोय नाही त्यांची राहण्याची व्यवस्था बँकेत करणार असल्याचे बँकेचे चेअरमन नवनाथ जाधव यांनी सांगितले.