निमगाव : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, निमगांव येथील हिंदी विभाग प्रमुख आणि अखिल भारतीय हिंदी महासभा, नवी दिल्ली, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजाराम शेवाळे यांना ऋषी वैदिक साहित्य पुस्तकालयातर्फे (आगरा, उत्तरप्रदेश) दिला जाणारा २०२३ चा 'गुरूदेव रवींद्रनाथ टागोर स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. डॉ. राजाराम शेवाळे यांनी हिंदी साहित्याचा प्रचार, प्रसार आणि संस्कृती संरक्षणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
'गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्मृती पुरस्कार' २०२३ मिळाल्याबद्दल डॉ. राजाराम शेवाळे यांचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समन्वयक व पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य मा. डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ.अद्वय हिरे-पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या उपाध्यक्षा मा. डॉ. संपदा हिरे आदींनी अभिनंदन केले. तसेच निमगाव महाविद्यालय परिवार आणि समाजातील विविध घटकांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा, शुभेच्छांचा वर्षाव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.