खेड शहरातील रस्ते-गटारांची दयनिय अवस्था, काँग्रेस जिल्हा उपाध्यांक्षाचे न.प.ला निवेदन



सूर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

    शहरातील विशेषतः डाकबंगला परिसरातील रस्ते तसेच गटाराःची अवस्था दयनिय बनली असून गटारांमध्ये सांडपाणी मोठ्याप्रमाणात साचून राहत आहे. यामुळे साथीःचे आजार फैलावण्याची दाट शक्यता असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

      दरम्यान, डाकबंगला येथील शकिल जसनाईक यांचे घर ते शशी पाटणे घर हा रस्ता तसेच शकिल जसनाईक घरासमोरील गटार तात्काळ नव्याने बांघण्याबाबचे निवेदन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डाॕ. विलास शेळके यांनी येथील मुख्याधीकारी यांना दिले आहे.

     नादूरुस्त गटारामुळे श्री. जसनाईक याःआलीच्या घराच्या संरक्षक भिंतीला तडे गेले असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामूळे येत्या पावसाळ्यापूर्वी रस्ता तसेच गटाराचे बाःधकाम करण्याची मागणी करण्यात  आली आहे.