काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारांना जीवे मारण्याच्या धमकी निषेधार्थ लोणार तालुका व‌ शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने पोलीस स्टेशन लोणार ला‌ निवेदन


 

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारांना जीवे मारण्याच्या धमकी निषेधार्थ बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माझी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या आदेशानुसार आज लोणार तालुका व‌ शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने पोलीस स्टेशन लोणार ला‌ निवेदन देण्यात आले.कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांना व त्यांच्या परिवाराला गैरअर्जदार मानिकांता राठोड यांचे कडून जिवे मारुण टाकण्याबाबतच्या धमकीचा आडीयो क्लिप सोशल मिडीयाव्दारे व्हायरल झाला सदर ऑडीओ क्लीप मध्ये चित्तापुर विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार मानिकांता राठोड व अन्य एका अज्ञात व्यक्तीसोबत मिळुन संगणमताने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांना व त्यांच्या परिवाराला जिवे मारण्याची संपवून टाकण्याची धमकी देताना व कट कारस्थान करतांना आढळून येत आहेत.

 मल्लिकार्जुन खर्गे हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांना व त्यांच्या परिवाराला गैरअर्जदाराकडून जिवे मारण्याचे कट कारस्थान रचणे म्हणजेच एक प्रकारे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरील गुन्हा हा गंभीर दखलपात्र व आजामीनपात्र स्वरुपाचा आहे. तसेच देशाच्या प्रमुख विरोधी पक्षांच्या अध्यक्ष स्थानी असणाऱ्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देणे, हा प्रकार अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे. तेव्हा सदर प्रकरणात भादंवि कलम 120 ब,504 व 506 अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या चित्तापुर मतदार संघाचा अधिकृत उमेदवार नामे माणिकांता राठोड व अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंदवून सदर आता अटक करण्यात यावी.मा. सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार व ईतर (Write Peti- tion) (Criminal) 68 Of 2018 ) या खटल्यात दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार दखलपात्र अजामीनपात्र गुन्हयात FIR दाखल करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सदर प्रकरणांत FIR. दाखल करून सदर आरोपांना त्वरीत अटक करण्यांत यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राजेश मापारी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी, शेख समद शेख अहमद, महाराष्ट्र प्रदेश सेवा दलाचे नेते प्रकाश धुमाळ, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, माजी जिल्हा कोषाध्यक्ष शांतीलाल गुगलीया ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, गटनेते भूषण मापारी, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष तोफिक कुरेशी शिवसेना उद्धव गटाचे शहर प्रमुख गजानन जाधव,नगरसेवक शेख रहुफ भाई, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे, नगरसेवक शेख असलम शेख कासम, माजी नगरसेवक पंढरी चाटे, गजानन मापारी, माजी नगरसेवक,शाम राऊत, संजय काशीराम जाधव, आप्पा शिंदे, एन एस यु आय चे सरचिटणीस शेख जुनेद शेख करामत, शेख जुबेर चौधरी, शेख अखिल मुल्लाजी उपस्थित होते.