कमाल तापमान अधिक; मुंबई, पुण्यापेक्षा उन्‍हाच्‍या नाशिकला तीव्र झळा


अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी 

        10 मे नाशिक: अल्हाददायक वातावरण अशी ओळख असलेल्‍या नाशिकमध्ये सध्या उन्‍हाचा तडाखा जाणवत आहे. प्रखर सुर्यकिरणांमुळे दिवसा जनजीवनावर परिणाम होतो आहे. विशेष म्‍हणजे मुंबई, पुण्यापेक्षाही नाशिकचे कमाल तापमान अधिक राहात आहे.  

        दरम्यान, बुधवारी (ता. १०) प्रथमच तापमान ४०.२ अंश नोंदविले गेले असून, येत्‍या आठवड्याभरात पारा आणखी तीन ते पाच अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आलेली आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कमालीचा उकाडा जाणवतो आहे.बुधवारी (ता. १०) ढगाळ वातावरणामुळे तीव्र सुर्यकिरणांपासून नाशिककरांचा बचाव झालेला असला, तरी उकाड्याने नागरिकांना बेजार केले होते. आठवड्याभरापासून तीव्र उन्‍हाच्‍या झळा बसत असल्‍याने दिवसा जनजीवन प्रभावित झाल्‍याचे बघायला मिळाले.दुपारी बारा ते दोनच्‍या दरम्‍यान शहरातील प्रमुख बाजारपेठा, रस्‍ते ओस पडल्‍याचे दृष्य बघायला मिळत होते. विशेष म्‍हणजे सुदृढ हवामानासाठी नाशिकची ओळख असली, तरी सध्या मुंबई, पुण्यापेक्षा नाशिकचे कमाल तामपान अधिक राहाते.

        गतवर्षीपेक्षा राहाणार अधिक तापमान?गेल्‍यावर्षी २०२२ मध्ये उन्‍हाळ्यातील उच्चांकी कमाल तापमान एप्रिलमध्ये ४१.१ अंश सेल्‍सीयस एवढे नोंदविले गेले होते. त्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्‍यात उच्चांकी कमाल तापमान ३९.२ अंश सेल्‍सीयस नोंदविले गेले आहे. सध्या नाशिकचे तापमान चाळीस अंशांच्‍या जवळपास राहात असून, ३ ते ५ अंश वाढीची शक्‍यता असल्याने गतवर्षीचा कमाल तापमानाचा विक्रम मोडीत निघण्याची शक्‍यता आहे.दिवस काय अन्‌ रात्र काय..सद्यस्थितीत दिवसा सुर्याच्‍या तीव्र झळांमध्ये रस्‍त्‍यावर फिरणे मुश्‍कील झालेले आहे. टोपी, उपरणे, स्‍कार्पचा आधार घेत नागरिकांना फिरावे लागत आहे. रात्रीच्‍या वेळीदेखील कमालीचा उकाडा जाणवत असल्‍याने, दिलासा मिळविण्यासाठी एसी, कुलर, फॅनची सहाय्यता घेतली जात असल्‍याचे बघायला मिळते आहे.तापमानाची तुलनात्‍मक आकडेवारी (अंश सेल्‍सीयसमध्ये)दिनांक नाशिक मुंबई पुणेकिमान कमाल किमान कमाल किमान कमाल७ मे २१.८ ३४.५ २७.२ ३२.६ २३.० ३२.६८ मे २२.८ ३६.५ २७.५ ३२.२ २५.८ ३६.८९ मे २३.४ ३८.८ २७.५ ३२.७ २४.२ ३६.५