अहमदपूर - प्रतिनिधी
येथील व्यंगचित्रकार चंद्रशेखर भालेराव यांनी कार्टूनीस्ट कॅम्बाइन व युवा संवाद सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सूरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात आपली व्यंगचित्रे प्रदर्शीत करून सहभाग नोंदवला.
या महोत्सवाचे व व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा सुप्रसिध्द व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.या व्यंगचित्रं प्रदर्शनात महाराष्ट्रतील नामवंत व्यंगचित्रकार संजय मिस्त्री धनराज गरड चारुहास पंडित प्रशांत कुलकर्णी प्रभाकर वाईरकर योगेंद्र भगत प्रभाकर झळके विश्वास सुर्यवंशी लहू काळे अतुल पुरंदरे किशोर शितोळे गजानन घोंगडे यांच्यासह चंद्रशेखर भालेराव यांच्या व्यंगचित्रांचा समावेश आहे
.राज ठाकरेंनी यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटून चालू घडामोडींचे दर्शन घडवले.सहभागी व्यंगचित्रकरांची व्यंगचित्रे पाहून त्यांनी सर्वांचे कौतूक ही केले.तीन दिवसीय सूरु असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात परिसंवाद, प्रात्यक्षिक व मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या व्यंगचित्रं प्रदर्शनात महाराष्ट्रासह इतर राज्यातील एकूण 300 पेक्षा अधिक व्यंगचित्रकारांचा सहभाग होता.