शासकीय योजना तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहचवा - आ.दिलीप बोरसे



प्रतिनीधी  बागलान 

सटाणा दि.०५ : शासनाकडून राबविण्यात येत असलेले जत्रा शासकीय योजनांची हे अभियान विशेषत्वाने ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी केवळ देखावा न करता सर्वसामान्य जनतेला थेट लाभ मिळवून देण्यासाठी अभियानात सातत्य ठेवावे तसेच दुर्गम दुर्लक्षित भागापर्यंत अभियानाचा प्रसार ,प्रचार करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांची अधिकाधिक माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी गांभीर्यपूर्वक योगदान द्यावे असे आवाहन आमदार दिलीप बोरसे यांनी केले.

शासनाच्या जत्रा शासकीय योजनांची या अभियानाचा तालुक्यातील चौंधाणे येथे शुभारंभ केल्यानंतर आमदार बोरसे बोलत होते.शासन स्तरावरून सर्वसामान्य जनतेसाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.बागलाण तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेसह दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत हे अभियान पोहोचले पाहिजे.या अभियानाच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे,याकडे सर्व विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे आणि त्यासाठी ठिकठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घ्यावा असेही पुढे बोलताना आमदार बोरसे म्हणाले.यावेळी आमदार बोरसे यांच्या हस्ते महसुल विभागाच्या वतीने रेशन कार्ड,जातीचे दाखले,वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,संजय गांधी लाभार्थी प्रमाणपत्र व मतदान कार्ड वाटप करण्यात आले.तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व कृषी यात्रिकीकरण राज्य योजनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर,थ्रेशर मशीन,पेरणी यंत्र अनुदान लाभ देण्यात आला.बागलाण पंयायत समितीच्या वतीने महालक्ष्मी स्वयंम सहायता समुह चौंधाणे यांना पापड गृह उद्योगासाठी २ लाख ९२ हजार रुपयांचा धनादेश उमेद अभियानाकडून देण्यात आला.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प बागलाणअंतर्गत स्तनदा मातांना बेबी केअर किट वाटप करण्यात आले.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लम्पी रोगाबाबत मार्गदर्शन व विभागाच्या योजनेबाबत शेतकर्‍यांना माहिती देण्यात आली.ग्रामपंचायत विभागाच्या वतीने समाज कल्याण व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत रक्तदाब व साखर नियंत्रण तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार विजय सूर्यवंशी,परिविक्षााधिन तहसीलदार श्रीमती श्रध्दा बागराव,बी.जे.बहिरम, विनोदकुमार चव्हाण,राहुल निकम,बिंदूशेठ शर्मा, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार,सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहल लाड,विस्तार अधिकारी नितीन देशमुख,बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज जाधव,पशुवैदयकिय अधिकारी डॉ. चंदन रुंद्रवंशी,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गौरी सूर्यवंशी,विस्तार अधिकारी एन.के.देवरे,तालुका अभियान व्यवस्थापक एस.जे.चव्हाण,सरपंच सौ.विमलबाई मोरे,उपसरपंच खंडू मोरे,ग्रामपंचायत सदस्य बापु वाघ,बाळकृष्ण बागुल,रविंद्र पवार,हेमंत मोरे,सौ.ललिता अहिरे,सौ.मंगल मोरे,भगवान मोरे, प्रकाश मोरे,योगेश मोरे,संदिप मोरे,ग्रामसेवक एस.एस.निकम,मंडळ कृषी अधिकारी व्ही.जी.भामरे तसेच अंगणवाडी परिवेक्षका,सेविका,मदतनीस,आशा वर्कर,मंडळ अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,तलाठी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका,पशुधन पर्यवेक्षक,ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 व चौंधाणे येथे जत्रा शासकीय योजनांची अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व कृषी यात्रिकीकरण राज्य योजनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ट्रॅक्टर,थ्रेशर मशीन,पेरणी यंत्र अनुदान लाभ वाटप करतांना आमदार दिलीप बोरसे, समवेत उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार विजय सूर्यवंशी,परिविक्षााधिन तहसीलदार श्रध्दा बागराव ई. उपस्थित होते