कंटेनर आणि बसचा भीषण अपघात; ९ जण ठार

 

बुलढाणा : शेगाव येथे झालेल्या अपघातात चार भावीक ठार झाल्याच्या घटनेला २४ तास लोटत नाहीत तोच, बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण अपघात  घडला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस पुणे येथून मेहकरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने बसला जबर धडक दिली. यात बस अक्षरशः चिरली गेली तर केबिनच्या चुरडा झाला. या दुर्घटनेत ९ प्रवासी ठार झाले आहेत तर १५ प्रवासी जखमी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आगारातून पुणे येथे बसफेरी सुरु आहे. ही बस (क्रमांक एमएच ४०-५८०२) सोमवारी रात्री पुणे येथून परत मेहकर कडे येत होती. रात्रीचा प्रवास करत बस पुण्यावरून छत्रपती संभाजीनगर येथे वेळ थांबली. तेथून काही प्रवासी बसमध्ये चढले. नंतर ही बस मेहकरच्या दिशेने निघाली. पहाटेचा वेळ असल्याने प्रवासी झोपेत हिते.दरम्यान ही बस सकाळी सहा वाजताच्या सुमारास सिंदखेड राजा जवळ असताना काहीकळायच्या मोह आवाज झाला. विरुध्द दिशेने येत असलेले कंटेनर ट्रक (क्रमांक ओडी ११एस १६५७) बसला धडकले. या कंटेनरने बस चिरली गेली आणि प्रवाशी गंभीर झाले.