मंथन जनरल नॉलेज परीक्षेत ज्ञानदेवी विद्यालयाचे विद्यार्थ्यांची गगन भरारी



बागलाण | आकाश साळुंके


 सटाणा दि.०३ :- येथील मोना एज्युकेशन अँड         वेल्फेअर सोसायटी संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय(सेमी इंग्लिश) मुंजवाड या विद्यालयातील विद्यार्थांनी मंथन जनरल नॉलेज परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान यंदाही पटकावला.

       मंथन जनरल नॉलेज परीक्षा(MTSE) फेब्रुवारी २०२३ आयोजित करण्यात आलेली होती. वर्षभरात विद्यार्थ्यांकडून विद्यालयात शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची परिपुर्ण तयारी करून घेण्यात येते.यासाठी विद्यार्थांना कोणत्याही खाजगी शिकवण्याची गरज भासत नसते.शाळेतच उत्तम तयारी, भरपुर सराव,तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन केले जाते यामुळेच विद्यार्थांनी परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन परिसरातील सेमी इंग्रजी माध्यमासाठी एक आदर्श व उत्तम शिक्षण देणारी शाळा असा नावलौकिक मिळविला असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर एन शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

दरम्यान गुणवत्ता यादीत आलेल्या आलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ. दौलतरावजी गांगुर्डे यांनी अभिनंदन केले व  पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थांची नावे पुढीलप्रमाणे:

१)अनुष्का वजेसिंह गवळी(१ली-१०० गुण केंद्रात १ली, जिल्ह्यात २३वी, राज्यात २६वी )

२) केतन शिवाजी गांगुर्डे (१ली-१००गुण केंद्रात १, जिल्ह्यात २३वा, राज्यात २६वा)

३) दिपांशू शरद इंगळे (१ली-१०० गुण केंद्रात १, जिल्ह्यात २३वा, राज्यात २६ वा )

४) संस्कृती योगेश

 बिरारी(१ली-९२गुण केंद्रात २ जिल्ह्यात २७, राज्यात ३० )

५) देवेंद्र नितीन बोरसे (१ली-९२ गुण

केंद्रात २ जिल्ह्यात २७, राज्यात ३० )

६) अनन्या योगेश जाधव (२री-९० गुण केंद्रात १ जिल्ह्यात २५, राज्यात ३० )

७) श्री विहार जाधव (३री २६०गुण

केंद्रात १ जिल्ह्यात ६ राज्यात २० )

८) अवनी दिपक देवरे (३री २३२गुण

केंद्रात २ जिल्ह्यात १९, राज्यात ३४)

९) ईश्वरी शांताराम ठोके (४थी २२०गुण केंद्रात १ जिल्ह्यात १९, राज्यात ३९ )

१०) अंकित यशवंत जाधव (६वी १४८गुण केंद्रात १जिल्ह्यात ४१, राज्यात ७३)

११) रिया दिलीप खैरनार (७वी १६२गुण केंद्रात १ जिल्ह्यात ३२ राज्यात ५२)

सदर सर्व विद्यार्थांना लवकरच मंथन पब्लिकेशन यांच्याकडून रोख बक्षीस, प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी वितरीत करण्यात येणार आहे.

  सदर विद्यार्थांना मुख्याध्यापिका श्रीमती आर एन शिंदे, संगीता वाणी,प्रकाश मोरे , महेंद्र मांडवडे,पुनम वाघ,दीपिका खरे, प्रियंका निकम आदि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ दौलताराव गांगुर्डे ,संस्थेचे उपाध्यक्ष मा डॉ भूषण गांगुर्डे , सरचिटणीस श्रीम अंजलीताई गांगुर्डे  विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम आर एन शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

 या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.