खान्देशातील सर्वात मोठ्या ८५ गाव वॉटर ग्रीड योजनेचे आ. जयकुमारभाऊ रावल व खा. डॉ. सुभाषबाबा भामरे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन.


       खानदेशातील सर्वात मोठ्या व शिंदखेडा तालुक्यातील ८५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या  चिमठाणे व ८५ गाव वॉटर ग्रीड योजनेचे भूमीपूजन माजी मंत्री आमदार जयकुमारभाऊ रावल व माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष बाबा भामरे यांच्या हस्ते साळवे फाटा येथील क्रांतीस्मारकासमोर भूमीपूजन झाले.

     यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भाजपाचे गटनेते कामराज निकम, शिंदखेडा पंस सभापती वंदना भारत ईशी, उपसभापती रणजीत गिरासे, जि प च्या महिला बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, शिक्षण व आरोग्य सभापती महाविरसिंह रावल, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र देसले, कार्यकारी अभियंता निकम, माजी जि प उपाध्यक्षा कुसुम निकम, भारत ईशी, जि प सदस्य  ज्योती देवीदास बोरसे, सदस्या सोनी पंकज कदम, सदस्या सत्यभामा धनंजय मंगळे, माजी सभापती किशोर रंगराव पाटील, डी आर पाटील, पंकज कदम, माजी जि प सदस्य विरेंद्रसिंग गिरासे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. आर जी खैरनार,  चंद्रकलाताई सिसोदिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच पं.स. सदस्य प्रवीण मोरे, दीपक मोरे, राजेश बोरसे, दुल्लभ सोनवणे, अरुण पाटील, रणजित गिरासे, डी एस गिरासे, बाजार समितीचे जिजाबराव सोनवणे, डॉ. दीपक बोरसे, पी एल पवार, शरद पवार, आत्माराम पाटील, संजय ठाकरे, हर्षवर्धन बागल, दगेसिंग गिरासे, मोतीलाल वाकडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी ८५ गावांचे भाजपाचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.