विविध ग्रामपंचायत कर्मचारी च्या मागण्या संदर्भात खा. साहेबयांना निवेदन

 

    कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 5692 नांदेड जिल्हा यांच्या वतीने  यांच्या विविध ग्रामपंचायत कर्मचारी च्या  मागण्या संदर्भात राज्यसभेचे माजी खासदार स्वराज्यप्रमुख श्री  छत्रपती संभाजी महाराज यांना वायफणा ता.हदगाव.जि.नांदेड  येथे आले असता श्री.प्रदीपभाऊ वाघमारे(जिल्हा अध्यक्ष कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 5692 नांदेड जिल्हा) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटने चे  तरुण तडपदार जिल्हा उपाध्यक्ष श्री पप्पुभाऊ दुगाळे यांनी निवेदन देवून ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या असलेल्या मागण्या विषयी चर्चा केली..आणि श्री  छत्रपती संभाजी महाराज यांनी कोल्हापूर येथे नांदेड जिल्हा कार्यकारणी नी भेट घ्यावी आणि मी स्वतः राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री.गिरीश महाजन साहेब यांच्या शी बैठक लावू असे आश्वासन दिले आहेत