शहापूर मध्ये राज ठाकरे यांचा झंझावाती दौरा.



प्रतिनिधी- चेतन भोसले 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे ठाणे जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्यावर मागच्या ३  दिवसापासून आहेत.  ह्या दौऱ्यात पक्ष कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी व पदाधिकारी मार्गदर्शन राज ठाकरे हे करत आहेत.  राज ठाकरे दिनांक १३ मे रोजी शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे भव्य स्वागत शहापूर तालुका मनसे तर्फे करण्यात आले . सदर कार्यक्रम वैश्य समाज हॉल येथे संपन्न झाला.  ह्या वेळी राज ठाकरे यांनी शहापूर तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले व तरुणांचे प्रश्न समजून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले . येत्या जून महिन्यात पक्षाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली.  या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागची निवडणूक लढवली नसून पुढील सर्व निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले . या वेळी व्यासपीठावर श्री राज ठाकरे यांच्या सह नेते श्री अनिल शिदोरे ,श्री अविनाश अभ्यंकर ,श्री अविनाश जाधव ,श्री अभिजित पानसे , आमदार श्री राजू दादा पाटील, माजी आमदार श्री प्रकाश भोईर ,उपाध्यक्ष श्री डी. के .म्हात्रे,श्री मदन पाटील श्री शैलेश बिडवी ई उपस्थित होते . 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे तालुका अध्यक्ष श्री विजय भेरे , माजी तालुका अध्यक्ष श्री जयवंत मांजे ,श्री रुपेश गुजरे ,दिलीप भोपतराव ,श्री राकेश वारघडे,श्री कौस्तुभ लिमये ,श्री रुपेश गुजरे, श्री विक्रांत मांजे,श्री दिनेश वेखंडे,श्री विनोद पाठारी,श्री सागर मोरे ई पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.