लातूर/प्रतिनिधी:
राष्ट्रीय लोककला सेवा मंडळ नागपूर व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर ता.काटोल पारडसिंग येथे महाराष्ट्रातील कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोककला सेवा मेळाव्याचं 3 मे रोजीआयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार सुभाष तगाळे.महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार. दैनिक राजधर्मचे ज्येष्ठ पत्रकार अंबादास अलमखाने यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार घुले यांनी अखिल भारतीय लोककला मेळाव्यात, माननीय डॉ.राजीवजी पोद्दार , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करुन सन्मानित करण्यात आले.
अल्पावधीतच उत्कृष्ट पत्रकारिता व शैक्षणिक,सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी ओबीसी बहुजण महाहासंघ उपाध्यक्ष दर्शनाताई घुले,महासचिव श्वेताताई रहागंडाले, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबुराव दुपारे तसेच महाराष्ट्रातील विदर्भासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक कलावंत व कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.