विनोद मोरे जिल्हा प्रतिनिधी रायगड
दि.03/05/2023 खालापूर
अशोक खेडकर सर यांना प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे शिलेदार श्री अशोक भीमराव खेडकर सर यांना रायगड जिल्ह्यातील शिक्षक संघ या संघटने कडून शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हे पुरस्कार शिक्षकांनी त्यांच्या शाळेवर केलेल्या अतुलनीय कामगिरी साठी देण्यात येतो.
खेडकर सरांचा शाळेचा काम अतिशय चांगला आहे. खालापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे खऱ्या हाडाच्या शिक्षकाला पुरस्कार मिळाला आहे. खालापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.राजेंद्र फुलावरे सर,जितेंद्र ठाकूर सर,जिल्हा कार्याध्यक्ष श्री. श्रीधर शेंडे सर,तालुकाध्यक्ष श्री.मस्तान बोरगे सर यांनी खालापूर तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.