श्री सोमेश्वर कृषी मार्केट दहिवेल चा कांदा जम्मू-काश्मीर कडे रवाना


 प्रतिनिधी साक्री संजय बच्छाव.

काल नंदुरबार रेल्वे स्थानकावरून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कांदा जम्मू-काश्मीरकडे रवाना करण्यात आला. खासदार डॉ. हिना ताई गावित यांच्या हस्ते रेल्वे स्थानकावर सोमेश्वर कृषी मार्केटचे संचालक श्री मनोज भाऊ चौधरी व सर्व कांदा व्यापारी आणि खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साक्री तालुक्यात रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते .परंतु कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यावर मात करत श्री मनोज  शेठ चौधरी यांनी दहिवेल येथे भव्य दिव्य असे श्री सोमेश्वर कृषी मार्केटची स्थापना करून डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते महिन्याभरापूर्वी उद्घाटन केले.

या अंतर्गत साक्री तालुक्यातून व दहिवेल कृषी मार्केट मधून प्रसिद्ध कांदा व्यापारी श्री मनोज शेठ चौधरी यांच्या प्रयत्नाने व हिनाताई गावित यांच्या पाठपुराव्याने पहिल्यांदाच कांदा रेल्वेने जम्मू-काश्मीर कडे रवाना होत आहे . या उपक्रमामुळे जिल्ह्यातील व साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल अशी उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये दिसू लागली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आपल्या दहिवेल श्री सोमेश्वर कृषी मार्केटचा कांदा असाच जर बाहेर देशात ,राज्यात, जात राहिला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा *घामाचा दाम* नक्कीच मिळेल. अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

पहिल्यांदाच रेल्वे रॅकने दहिवेल श्री सोमेश्वर कृषी मार्केटचा कांदा जम्मू-काश्मीर कडे श्री मनोज शेठ चौधरी यांनी रवाना केला त्याबद्दल दहिवेल व परिसरातील शेतकऱ्यांनी श्री मनोज शेठ चौधरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.