मॉर्डन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश!!

 


किरण माने इंदापूर प्रतिनिधी

      शेळगाव ३ मे मॉर्डन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळगाव या शाळेतील मुलांनी महाराष्ट्र परीक्षा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२२-२३ मध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला,असून त्यामध्ये इयत्ता पाचवी चे अनुक्रमे,पूर्वा शिंगाडे,संस्कृती मोहिते,मानवी खराडे,गौरी माने,स्वराली बोरकर, तसेच इयत्ता आठवीचे विद्यार्थी रोहन जाधव व साईप्रसाद सुटले या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवलेले आहेत.

       या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा संदर्भात चांगले मार्गदर्शन मुख्याध्यापक शितल वाघ, पूजा कोथिंबिरे,संतोष जाधव,नवनाथ पवार, प्रेमला शिंगाडे,प्रतिभा मोहिते,बोराटे सर यांनी शिष्यवृत्ती संदर्भात शिक्षणाचे धडे शिकवले.

         तसेच मॉर्डन स्कूलचे प्रचार्य संदीप जाधव, संस्था अध्यक्ष श्री भीमराव जाधव यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.