प्रतिनिधी: भिमराव कांबळे
अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव गावाजवळ असलेल्या पाझर तलावात आज दुपारी गावातील कांही मुलं पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याशेजारी मानवी कवठी, जबडा, व हाडे आढळून आली असता त्या मुलांनी गावात येऊन या धक्कादायक प्रकाराची माहीती गावातील लोकांना सांगीतली असता गावातील कांही लोकांनी प्रत्यक्ष्य जाऊन पाहणी केली असता त्या तलावात पाण्याशेजारी मानवी कवठी,जबड्याची हाडे कपडे हातातील कंगण इ. साहीत्य आढळून आले गावातील प्रत्यक्ष्य दर्शिनी किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांना फोनद्वारे कळविली असता तात्काळ घटनास्थळी पोलीस प्रशासन हजर झाले घटनेचा पंचनामा करून पूढील तपासास सुरुवात केली.
गावातील एक अंदाजे 38 वयवर्षे असणारा तरुण मागील 3 ते 4 महिन्यापासून बेपत्ता असल्याची चर्चा असून घटनास्थळी आढळलेले कपडे व हातातील कंगण यावरून हा सांगाडा गावातीलच तरुणाचा असल्याची चर्चा गावात होत असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत
यापूर्वी सुद्धा थोडगा साठवण तलावात निर्वस्त्र दोन महिलांचे प्रेत आढळूण आले होते व वाकी नदीजवळील साठवण तलावाच्या खड्यात एका तरुणाचे प्रेत निर्वस्त्र आढळून आले होते अशा घटना अहमदपूर तालूक्यात घडल्या असून अद्याप याचा तपास झाला नसल्याने पोलीस प्रशासनावर अजून एक मोठे आव्हान उभे राहीले आहे