राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे देवगाव फाटा येथे ट्रकची दुचाकीला जोरदार धडक एक ठार


खुलताबाद प्रतिनिधी हरिदास सराटे

 खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगांव येथिल राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे वर देवगांव फाटा येथे दुचाकीला छत्रपती संभाजीनगर कडून कन्नड कडे जाणाऱ्या ट्रक ची दुचाकीला जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.अपघातात ठार झालेला व्यक्तीचे नाव रामेश्वर कनिराम पवार (२५) असून तो जुनोने ता. चाळीसगाव जि. जळगांव येथील रहिवासी आहे.


 हा अपघात दि. २४ बुधवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गल्ले बोरगांव  ताःखुलताबाद  येथे सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावर वर देवगांव फाटा येथे झाला. चाळीसगाव तालुक्यातील जुनोने येथील रहिवाशी रामेश्वर कनिराम पवार व उमेश गोटीराम राठोड हे आपल्या दुचाकी क्रमांक  एम.एच.१९ 

ई.डी. ८६१९ या दुचाकीवरून देवळाणा ता. कन्नड येथून फडची बसवायचे काम आवरुन ते आपल्या गावी जात असताना गल्लेबोरगांव जवळील राष्ट्रीय महामार्ग देवगांव फाट्यावर रस्तावर येत असतांना यातच दुचाकीला छत्रपती संभाजीनगर कडून कन्नड कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक के.ए. ६३ ६७७० ची जोरदार धडक झाली.अपघात एवढा जबरदस्त होता की यात मागे बसलेल्या रामेश्वर पवार या दुचाकीस्वाराच्या अंगावरुन ट्रक गेले वाहनाने रामेश्वर पवार यास चिरडल्याने ते जागीच ठार झाला व दुचाकी चालक उमेश राठोड हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले यांना सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही.