संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
या कार्यक्रमासाठी ह भ प अनिल महाराज पोरे यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे तसेच मोहोळ चे आमदार यशवंत माने, ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव शिंगाडे, एडवोकेट लक्ष्मणराव शिंगाडे,संचलक राहुल जाधव,ग्रा.प सदस्य प्रतापसिंह चवरे, युवा नेते वैभव शिंगाडे,एडवोकेट अक्षय जाधव,चंद्रकांत जाधव, भिवा जाधव, शुभम शिंगाडे, मनोहर शिंगाडे, मनोहर जाधव, नितीन जाधव, मोहन जाधव, श्रीकांत जाधव तसेच भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.