तहसील कार्यालयासमोरील न .प.च्या नियोजित व्यापारी संकुलात म फुले दांपत्याचा पुतळा बसवण्यात यावे-महात्मा फुले ब्रिगेडची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी



अहमदपूर प्रतिनिधी: भिमराव कांबळे

अहमदपूर,दि.11प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयासमोर न.प. च्या नियोजित व्यापारी संकुलात महात्मा फुले दांपत्याचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक 11 मे रोजी मुख्य अधिकारी नगरपरिषद अहमदपूर यांच्याकडे महात्मा फुले ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महान समाज सुधारक समाज क्रांतीकारक भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करणारे स्त्री अस्पृश्यता मुक्तीचे प्रणेते कृषी तज्ञ अर्थतज्ञ उद्योगपती अभियंता शाहीर इतिहास संशोधक सार्वजनिक सत्यधर्म संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याचा एकही पुतळा आपल्या शहरात नाही म्हणून न.प.च्या नियोजित व्यापारी संकुलात महात्मा फुले दांपत्याचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी महात्मा फुले ब्रिगेडने केली आहे या निवेदनावर सो कविता गोरे प्राध्यापक सतीश ननीर पत्रकार दिनकर मद्देवार अरविंद डाके राम शिंदे शेषराव ससाणे गणेश डाके अशोक सोनकांबळे देवराज गोरे धम्मपाल कोले संग्राम गायकवाड मेगा माळी संदीप भोरे अमर चंदाले शेख युनूस महेश माळी कृष्णा राऊत सचिन माळी विश्वनाथ माळी यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत