डाॅ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित



अहमदपूर प्रतिनिधी: भिमराव कांबळे

अहमदपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांना तक्षशिला बूध्द विहार काळेगांव येथे समाजभूषण हा पुरस्कार देवून पुज्य भंते महाविरो थेरो यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी बुध्द जयंती निमित्त तक्षशिला बूध्द विहार येथे धम्मदेसना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सामाजिक तथा धम्म क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी नगरसेवक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांना स्मृतीचिन्ह आणी मानपत्र देवून भंते महाविरो आणी भंते शरणंकर यांच्या हस्ते व हजारो धम्मबांधवांच्या साक्षीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुरुवातीला धम्म ध्वजारोहण करण्यात आलेत्यानंतर पुजापाठ संपन्न झाले.शेवटी भंते शरणंकर आणी भंते महाविरो थेरो यांची धम्मदेसना संपन्न झाली.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी सदरील पुरस्कार प्रदान करून पाठीवर थाप दिली असून सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक,सांस्कृतिक आणी प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

या पुरस्काराने माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढणार आहे.तसेच पुरस्कारामूळे अधिकची जबाबदारी सूध्दा वाढली आहे.जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या उत्थानासाठीच माझे प्रयत्न असणार असल्याचे सांगीतले.तसेच प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात काम करत असताना समाजाला रिटर्न म्हणून काही योगदान दिले पाहीजे असेही प्रतिपादन शेवटी केले.

या प्रसंगी विहाराच्या विविध कामासाठी योगदान देणाऱ्या समाजातील विविध मान्यवरांना सूध्दा सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमास साधारणतः दहा हजार धम्म उपासक उपासिका उपस्थित होते.