वैदू समाज शैक्षणिक परिवर्तनासाठी सामाजिक उपक्रम


 किरण माने इंदापूर प्रतिनिधी

   शेळगाव : (ता. १२ ) दिनांक १२ मे २०२३ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शाहू - फुले - आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांच्या अभ्यासातून वैदू समाजातील शैक्षणिक परिवर्तनासाठी वैदू समाज विकास संस्था स्थापन करून त्या माध्यमातून वैदू समाजातील शिक्षण घेत असलेल्या मुलांना शैक्षणिक विकासाच्या प्रवाहात आणून त्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला जात आहे.

 गेली दोन वर्षापासून ही संस्था वैदू समाजातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण पुस्तकाचा संच मोफत स्वरूपात देऊन त्यांना समाजातील शिक्षक वर्गाकडून मार्गदर्शनही केले जाते. वर्षानुवर्ष भटकंती करून उपजीविका करणाऱ्या वैदू समाजाला गेल्या काही वर्षापासून शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी या समाजातील शिक्षित असलेल्या तरुणांकडून नियमित मदत करून त्यांची भटकंती कमी करून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

      या प्रोत्साहनामुळे आज या समाजातील अनेक तरुण क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवून उच्च शिक्षित होऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत, अशाच प्रकारे क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य मिळवून पुणे ग्रामीण पोलीस निवड झालेल्या उमेश दुर्गा शिंदे व राज्यस्तरीय थाळी फेक स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुनील वाघमोडे या तरुणांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. शिक्षणातून उत्तम प्रकारे बदल घडवणाऱ्यांसाठी यापुढे बारावीच्या विद्यार्थ्यांनाही संच देण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची आस लागावी, या हेतूने दहावी-बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते.

         या सामाजिक उपक्रमासाठी शेळगावच्या पोलीस पाटील उषा वाघमोडे, यल्लाप्पा वाघमोडे, रामभाऊ शिंदे,बापु वाघमोडे (पुणे ग्रामीण पोलीस ), अशोक निंबाळकर सर, पांडुरंग वाघमोडे,साहेबराव वाघमोडे बापू शिंदे बाळू शिंदे, रमेश वाघमोडे,सुरेश शिंदे,हुसेन शिंदे,किरण सूर्यवंशी,विशाल वाघमोडे,तायाप्पा शिंदे , महेश शिंदे ( इंजिनीअर),सुनिल वाघमोडे ( इंजिनीअर),राजु वाघमोडे (इंजिनीअर), सागर वाघमोडे, सुरज वाघमोडे,महेश लोखंडे ( LIC ),शंकर वाघमोडे (मा.ग्रा.सदस्य) , समिर लोखंडे , सुनिल सुर्यवंशी या मान्यवरांनी योगदान दिले. तसेच निखिल शिंदे सर व रावसो वाघमोडे सर यांनी करिअर मार्गदर्शन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू निंबाळकर यांनी तर आभार साहिल वाघमोडे यांनी मानले.